अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. बालाजी कल्याणकरांनी केली पाहणी.

गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे शेतीचे अतोनात नुकसान.

379

नांदेड-

गेल्या दोन दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड उत्तर मतदारसंघातील अनेक भाग जलमय झाले आहेत. पावसाच्या हाहाकारामुळे हजारो हेक्टर शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत.अनेक नदी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक भागाचा संपर्क तुटला आहे. तसेच गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे अनेक शेतकरी शेतातच अडकून पडले आहेत. अशा नागरिकांना गावात सुखरुप परत आणण्यासाठी आ. बालाजी कल्याणकर यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. तसेच त्यांनी स्वतः बुधवारी सकाळी सुगाव येथील शेतकऱ्यांना आपल्या बोटीत बसून सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच आ. बालाजी कल्याणकर यांनी नांदेड उत्तर मतदारसंघातील सुगाव खु., सुगाव बु.,निळा,एकदरा, आलेगाव यासह आदी गावांच्या शेतशिवाराची पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधीकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार विजयकुमार पाटे, मंडळ अधिकारी अनिल धुळगुंडे, तलाठी शिवलिंग घंटोड, लिंबगाव सज्जाचे मंडळधिकारी शिंदे, तलाठी चिदगिरे, कृषि सहायक माधुरी राजूरकर, ग्रामसेवक विलास वाघमारे यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या प्रमणात उपस्थित होते.

नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी बुधवारी सकाळी आपल्या मतदार संघातील गोदावरी व आसना नदी काठच्या गावांना भेटी दिल्या. यावेळी गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे सुगाव, थुगाव, रहाटी, जैतापुर शिवारातील शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याबरोबर आसना नदीला पुर येवून निळा एकदरा, आलेगाव, चिकली, पासदगाव शिवरातील पिके भुईसपाट झाले आहेत. तसेच आ. बालाजी कल्याणकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, नांदेड उत्तर मतदार संघातील अनेक गावच्या शेती शिवाराची पाहणी केली. यावेळी मुसळधार पडलेल्या पावसामुळे शेती शिवारातील पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसटला आहे. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मदत करणे आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. तसेच अनेक ठिकांणी जनावरे मरण पावले आहेत. त्याबरोबर घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे आ. बालाजी कल्याणकर यांनी प्रशासनाला देखील सरसकट पंचनामे करण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत पत्र दिले आहे. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना सरसकट पंचनामे करण्याबाबत पत्र दिले आहे. या पाहणी दौऱ्या दरम्यान आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत सुगावचे सरपंच अनिल शिंदे, माधव महाराज हिंगमिरे, संतोष भारसावडे, पांडुरंग शिंदे, दत्ता भोसले, ज्ञानेश्वर भोसले, निळ्याचे सरपंच रोहित हिंगोले, उपसरपंच पवार, बाबासाहेब जोगदंड, नवनाथ जोगदंड, ज्ञानेश्वर माऊली, एकदराचे सरपंच गंगाधर बोकारे, युवा सेनेचे गजानन कदम, धनंजय पावडे आलेगावचे सरपंच प्रतिनिधी शहाजी पाटील, संभाजी ब्रिगेडचे परमेश्वर पाटील, बालासाहेब पाटील, गुलाबराव पाटील, चांदोजी पैलवान, श्रीरंग पाटील, रमेश बोखारे, भगवान गीरी, संभाजी पाटील, गजानंन पाटील, गोविंद पाटील यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.