अतिवृष्टीचे पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सुचना द्या – माजी आ.वसंतराव चव्हाण.

346

नायगाव, नांदेड-
सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने पिके व घरे पाण्याखाली गेली असून नायगाव विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी आग्रही मागणी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

नांदेड जिल्ह्यात ता.६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे उभ्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून विशेषताः नायगांव, उमरी, धर्माबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मंगळवारी माहिती घेतली असता दुपारी २ वाजेपर्यंत या भागातील संपुर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. आणि उडीद, सोयाबीन, कापूस, ऊस, तुर उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. नदीकाठच्या गावामध्ये तर भयानक स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती मिळते. अशा परिस्थितीत जिल्हा व तालुका प्रशासन सतर्क असुन जिवितहानी तसेच जनावरांच्या बाबतीत माहिती घेत आहेत. पण सततच्या पावसामुळे गावपातळीवरील यंत्रणेकडून संपर्क होणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत शेतीचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी मोठया प्रमाणात संकटात सापडला आहे.

तरी याबाबत आपल्या मार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत यंत्रणेस सुचीत करुन शासनामार्फत नुकसान भरपाई किंवा अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना भरीव असे अनुदान मंजुर करणे बाबत मा मंत्री, मदत व पुर्नवसन यांना शिफारस करावी आणि शेतक-यांना मदत मिळवून दयावी अशी आग्रही मागणी माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.