अनेक दिवसांपासून येणाऱ्या तापीमुळेच चिमुकलीचा मृत्यू.

906

नांदेड –

अनेक दिवसांपासून येत असलेल्या तापीमुळेच त्रस्त असलेल्या एका सहा वर्षीय चिमुकलीचा अखेर उपचारादरम्यान, करूण अंत झाला आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी विष्णूपुरी,नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात घडली आहे.

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दी अंतर्गत असलेल्या गाडगेबाबा सोसायटी, जुना कौठा येथील रहिवासी कु. सृष्टी प्रकाश यादव (वय-०६ वर्षे) या शाळकरी चिमुकल्या मुलीस २४ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान, राहत्या घरी ताप आला. दरम्यान, सृष्टी यादव हिला उपचाराकरिता नांदेड शहरातील एका सुप्रसिद्ध खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नांदेडच्या खाजगी रूग्णालयात सृष्टीचा ताप कमी झाला नसल्यामुळे पुढील उपचाराकरिता तिला हैद्राबाद येथील प्रसिद्ध खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, हैद्राबाद येथील रूग्णालयातील उपचाराने सृष्टीच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही. दरम्यान, चिमुकली सृष्टी यादव हिच्या नातेवाईकांकडील पैसे संपल्याने सृष्टीला उपचाराकरिता परत विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारादरम्यान, अखेर १२ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे चार वाजेदरम्यान, सृष्टी यादव हिचा करूण अंत झाला असल्याचे घोषित केले आहे, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस पो. कॉ. जनार्धन महाले यांनी दिली.

याप्रकरणी मयत सृष्टी यादवचे वडील प्रकाश भगवान यादव यांनी दिलेल्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर रोजी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आलीआहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नामदेव जी. सूर्यवंशी हे याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. चिमुकली सृष्टी यादव हिचा तापीने मृत्यु झाल्याबद्दल नांदेडच्या जुना कौठा तसेच नवीन कौठा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.