अभिनेता प्रवीण तरडे यांची अचानक घोषणा आणि चाहत्यांचा सवाल, “भाऊ… नेमकं सांगा, कधी, कुठे?”

266

अभिनेता प्रवीण तरडे यांनी अचानक फेसबूकवर चाहत्यांसाठी एक घोषणा केल्याने चाहते अवाक झाले आहेत, प्रवीण तरडे यांना प्रश्न विचारु लागले आहेत, भाऊ… नेमकं सांगा कधी कुठे? कारण अभिनेता प्रवीण तरडे हे लवकरच एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत याची कल्पना प्रेक्षकांना आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांचे जवळचे अनेक मित्र झिजले, त्यात काही निवडक साथीदार क्रूर कोरोनाने त्यांच्यापासून हिरावून नेले आहेत. हे दु:ख उराशी बाळगून, जड मनाने का होईना, प्रवीण तरडे हे फेसबूकवर म्हणतायत, ६ जून सकाळी ११ वा . नक्की बघा, श्री छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिश्वर होताना…टीम सरसेनापती हंबीरराव.

एका प्रकारे रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्याचं आवाहन अभिनेता प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांना केलं असावं असं प्राथमिक अंदाज यावरुन लावता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.