अर्धापुरातील आशा सेविकेच्या मुलाच्या जिद्दीची सर्वत्र चर्चा…
हलाखीच्या परिस्थितीचा शिक्षणास बसतोय फटका..
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील आशा स्वयंसेविका शोभा सूर्यवंशी यांचा मुलगा स्वराज बालाजी सूर्यवंशी हा नांदेड येथील ऑक्सफर्ड ग्लोबल शाळेत शिकत होता. त्याला दहावीत ८६.०६ एवढी टक्केवारी शाळेच्या मूल्यांकनानुसार मिळाली, कमी गुण मिळाल्याने तो समाधानी नसल्याने व घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेचा लाभ मिळावा यासाठी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व योजनेस पात्र होण्यासाठी अथक परिश्रम घेत त्याने दहावीची फेरपरीक्षा दिली व या परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवले त्याच्या या जिद्दीची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
स्वराजची आई आशा सेविका असून त्याचे शिक्षण व कुटुंबाचा सर्व खर्च हा मिळालेल्या मानधनातून होत आहे. होतकरू व अभ्यासू विद्यार्थी असल्याने त्यांना शिक्षणाच्या खर्चासाठी पाठबळ मिळाल्यास त्याचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे.