अर्धापूर तालुका संवेदनशील आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला तसे सांगितले जाते तालुक्यातील सर्व भागातील घटकांना व तालुक्यात नव्याने समाविष्ट झालेली गावे व डोंगरदऱ्यातील जनसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, सामाजिक, राजकीय व सर्वच क्षेत्रांमध्ये ही संवेदनशीलता दिसून येते. त्याचे खरे कारण इथल्या पत्रकारितेत आहे.चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची, चांगल्याचे कौतुक करण्याची येथील पत्रकार मित्रांची भूमिका आहे. हिच खरी पत्रकारिता आहे. निर्भीडपणा असेल, तरच लोकशाही जीवंत राहू शकते, असे गौरवोद्गार हदगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे यांनी यावेळी बोलतांना केले आहे.
अर्धापूर तालुक्यात चाभरा येथे दि.११ मंगळवारी रोजी दर्पणदिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार डायरी, पेन व दिनदर्शिका भेट देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे हे होते. तर चाभरा येथील सरपंच सदाशिवराव चाभरकर, उपसरपंच अमोल बोले, नारायण सांगेवार, भगवान मरकुंदे, बबन बोले, श्यामराम देशमुख, बापूराव पावडे, भाऊराव चव्हाण, रामराव जाधव यांनी पत्रकारांचा सत्कार केला.यावेळी जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे, अध्यक्ष नागोराव भांगे, माजी अध्यक्ष निळकंठ मदने, माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, पत्रकार गोविंद टेकाळे, माजी जिल्हा कार्यकारिणी सदस्य सखाराम क्षिरसागर, गुणवंत विरकर, छगन पाटील इंगळे, प्रशांत पांडे ,उद्धव सरोदे,अनिल मोळके, संदीप राऊत, शकील शेख, रमेश विरकर, शेख मौला, दिपक विरकर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
सदर कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा साखरा येथे संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत दामेकर, बालासाहेब लोणे, बळीराम कदम, अशोक फुलवेकर, विनायक मुलंगे, सुनील कंठाळे, राजेश चिटकुलवार, पांडुरंग चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.