अर्धापूर तालुक्यातील गोविंद नगर शहापूर येथे कार्तिकी एकादशी निमित्त दि.१४ रविवारी रोजी श्री.विठ्ठल रुक्मिणी व पंचमुखी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा, होमहवन, पूजा विधी व महाआरती करून करण्यात आली.
श्रीस्वामी समर्थ मंदिरात विठ्ठल रुक्मिणी व पंचमुखी हनुमान यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा पणा कार्यक्रमास संस्थांनचे संस्थापक संतोष मधुकर साबळे महाराज, चेअरमन दिगंबर पवार, डाॅ.संजय सोनटक्के, सचिन पांचाळ, राजाराम पवार, आनंदराव पवार, माधवराव पवार, मारोतराव पवार, साहेबराव पवार, राजू गायकवाड, बंडू (केरबा)पिंपळपल्ले, संतोषराव कुराडे, प्रसाद साबळे, सोपानराव शिंदे, केशवराव पवार, बापूराव गायकवाड, शिवशंकर पवार, रामचंद्र पिपळपल्ले, संतोष पाटील पवार, देविदासराव पिंपळपल्ले, प्रल्हाद साळुंके, सौ.सविताताई साबळे, सौ.पांचाळ चाभरेकर, श्रीमती मुक्ताबाई साळुंखे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होताच उपस्थित भाविभक्तांना महाप्रसाद वाटप करण्यासाठी पंचक्रोशीतील स्वयंसेवक उपस्थित होते.