मकर संक्रांती निमित्त वाण देण्याची प्रथा आहे. स्टील, प्लास्टिकच्या वस्तू आदीसह विविध वेगवेगळ्या वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. या सर्व वस्तूना फाटा देत पार्डी म.येथील ग्रामपंचायत सदस्या सौ.साक्षी सचिन देशमुख यांनी आवळ्याचे रोप देऊन पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासत होती. याचा सामना अनेक रुग्णांना करावा लागला. नैसर्गिक ऑक्सिजन वाढून पर्यावरणाचे संवर्धन होणेही तितकेच आवश्यक आहे. याचा विचार करून आवळा जो मनुष्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास गुणकारी असलेल्या आरोग्यवर्धक आवळ्याच्या रोपांचे वाण ग्रामपंचायत सदस्या सौ.साक्षी सचिन देशमुख यांनी महिलांना दिले व त्या रोपांना जोपासण्याचा शब्दही त्यांच्याकडून घेतला आहे. त्यांच्या या चांगल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वीही कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत गावात सॅनिटायझरची फवारणी तंटामुक्तीचे अध्यक्ष सदाशिवराव देशमुख यांच्या कुटुंबियाच्या वतीने करण्यात आली होती. तसेच मास्क सॅनिटायझरचे वाटप केले होते. देशमुख कुटुंब नेहमी आपली सामाजिक बांधिलकी समजून असे सामाजिक उपक्रम राबवते.
यावेळी सौ.कुसुमताई सदाशिवराव देशमुख आणि सुमनबाई तथा ग्रामपंचायत सदस्या सौ.साक्षी देशमुख यांनी पुढाकार घेऊन शंभरच्यावर आवळ्याचे रोप वाटप केले आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ.जिजाबाई कांबळे, उपसरपंच सौ.सुमनबाई देशमुख, सौ.प्रतीक्षा देशमुख, सौ.मंगलबाई भांगे, सौ.वर्षा देशमुख, सौ.सारीकाबाई देशमुख,सौ.राधा भांगे,सौ.मनीषा देशमुख, सौ.सोनाली देशमुख,
सौ.चंद्रकलाबाई पवार, सौ.गीतांजली पवार, सौ.रेणुकाबाई पाटोळे आदीसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.