अर्धापूरच्या नगराध्यक्ष पदासाठी बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण कोणाला देणार संधी??

1,338
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –

नगराध्यक्ष पदासाठी सौ.देशमुख, कानोडे, सौ.शेटे, सौ. डॉ.लंगडे, सायरा बेगम काजी, यासमीन सुलताना खतीब, सरोदे यांच्यासह अनेक इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू

काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून नेतृत्व करणारे राजेश्वर शेट्टे यांच्या पत्नी सौ.शालिनी राजेश्वर शेट्टे, तर भाऊराव कारखान्याचे संचालक प्रवीण देशमुख यांच्या पत्नी सौ. वैशाली प्रवीण देशमुख व उच्च शिक्षित असलेले छत्रपती कानोडे, तर सभागृहाच्या अनुभव असलेल्या डॉ.पल्लवी विशाल लंगडे यांना यावेळी नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात होत आहे” तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण कोणाला संधी देतात याकडे अर्धापुरकरांचे लक्ष लागले आहे.

अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १७ पैकी १० जागेवर विजय मिळवत नगरपंचायत निवडणुकीत बहुमत प्राप्त केले आहे. दि. २७ जानेवारी रोजी मुबंई येथे दुपारी आरक्षण सोडत झाली असून, अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वसाधारण पदासाठी निवडून आलेले उमेदवार सौ.शालीनीताई राजेश्वर शेटे, डॉ.पल्लवीताई विशाल लंगडे, सौ.वैशालीताई प्रविण देशमुख, छत्रपती कानोडे, सोनाजी सरोदे, सौ.मिनाक्षी व्यंकटी राऊत, सायेरा बेगम काजी सल्लावोद्दीन, यास्मिन सुलताना मुस्वीर खतीब, सलीम कुरेशी, नामदेव सरोदे विजयी उमेदवार असुन यापैकी कोणाला नगराध्यक्षपदाची संधी येणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अर्धापूर नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष पदाचा बहुमान सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण सुटल्याने कै.श्रीमती रेखाताई अवधूतराव काकडे यांना मिळाला. यानंतर पुढील अडीच वर्षांचे आरक्षण सर्व साधारण पुरुषाला सुटल्याने दुसऱ्यांदा बहुमान नासेरखान पठाण तर दुसऱ्या नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत एस.सी सर्वसाधारण जागेवर तिसरा बहुमान सौ. प्रणिता उमाकांत सरोदे तर चौथा बहुमान सर्वसाधारण जागेसाठी सुमेरा बेगम लायक शेख यांनी पदभार स्वीकारला होता.

डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ मध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १७ पैकी १० जागी विजय मिळवत बहुमत प्राप्त केले असून “सर्वसाधारणसाठी” नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सुटले असून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अर्धापूर नगर पंचायत अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे बघणे उत्सुकतेचे राहील. अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला १०, तर एमआयएम ३,भाजपा २, राष्ट्रवादी १, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल असून सभागृहात सडेतोड उत्तर देणारे व अर्धापुरला विकासासाठी पुढाकार घेणारा नगराध्यक्ष म्हणून कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा जोरात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.