अर्धापूरच्या माधवी क्षीरसागरचे नवोदय परिक्षेत यश.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील बेलसार येथील कु.माधवी मारोती क्षीरसागर हिने नवोदय परिक्षेत यश संपादन केले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अर्धापूर तालुक्यातील बेलसर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी कु.माधवी मारोती क्षीरसागर हिने (निवड चाचणी परिक्षा २०२१) नवोदय परिक्षेत ९० टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केले आहे.तिने मिळवलेल्या यशाबद्दल काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, जि.प.सदस्य बबनराव बारसे, उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील पांगरीकर, उपसभापती अशोक कपाटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष कपाटे, माजी जि.प.सदस्य नागोराव इंगोले,शिवसेनेचे प्रल्हाद इंगोले, उपतालुका प्रमुख सदाशिव इंगळे,उपसरपंच भगवान पवार, मुख्याध्यापक सी.एम.नरवाडे,जे.डी.गिरी, सौ.मुगटकर मा.सरपंच दादाराव पाटील क्षिरसागर,अर्धापूर तालुका शेतकरी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश पाटील क्षिरसागर,
अशोक डांगे यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.