अर्धापूरातील सुतार समाजाच्या स्मशानभूमीची नोंद सातबारावर करा- सुतार समाजाची मागणी.
स्मशानभूमीत सर्व सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा नगरपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर येथील सुतार समाजाची स्मशानभूमीची नोंद सातबारावर करण्यात यावी तसेच स्मशानभूमीत दहनशेगडी व संरक्षण भिंत बांधून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा आगामी काळात होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सुतार समाजाच्या वतीने तहसीलदार अर्धापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शहरातील सुतार समाज गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमीची नोंद सातबारावर करण्यात यावी व स्मशान भूमीची संरक्षण भिंत व दहनशेगडी तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा नगरपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अशी मागणी तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर प्रा.तानाजी मेटकर, रवींद्र भालेराव, ईश्वर मेटकर, शंकर पांचाळ, गंगाराम भालेराव, गजानन भालेराव, नारायण मेटकर, बालाजी मिटकर, ज्ञानेश्वर भालेराव आदींच्या सह्या आहेत.