अर्धापूरातील ६७ हजार रुपयांचा बारदाना चोरट्यांनी पळवला..

509

सखाराम क्षीरसागर

अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर तालुक्यातील उपबाजार समितीच्या परिसरात फळे व भाजीपाला खरेदी-विक्री संघाचे गोदामाचे शटर फोडून त्यातील ६७ हजारांच्या बारदान्यासह साहित्य लंपास करत ७४ हजार ३०० रूपयांची चोरी केल्याची घटना अर्धापूर परिसरात घडली आहे.या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्या विरूद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड अंतर्गत असलेल्या उप बाजारपेठ अर्धापूर येथे असलेले भाड्याचे गोदाम अज्ञात चोरट्यांनी फोडले. गोदामाच्या शटरचा कडी-कोंडा तोडून त्यातुन बी.टी. बारदानाचे ३०५० नग ६७ हजार १०० रूपये किंमत व दोन वजनकाटे ७२०० रूपये किंमत असे एकुण ७४ हजार ३०० रुपये किंमतीचे साहित्य दि.२० ते २९ या कालावधीत चोरट्यांनी पळवले असल्याची घटना अर्धापूर परिसरात घडली.

सदर प्रकरण दि.२९ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आले आहे. विक्री संघाचे केंद्रप्रमुख अरुण सुनेगावकर यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ४५७ व ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारदाना चोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पि.टी.पवार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.