अर्धापूरात नुतन तहसीलदार उज्ज्वला पांगरकर रूजू.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
येथील तहसीलदार पदी उज्ज्वला पांगरकर मंगळवार रोजी रूजू झाल्या व पहिल्याच दिवशी तहसीलदार म्हणून त्यांनी कामकाज सुरू केले. अर्धापूरचे तहसीलदार सुजित नरहरे यांची मुदखेड येथे बदली झाली असल्याने त्यांच्या जागी तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांची नियुक्ती करण्यात आली.
दि. 21 सप्टें मंगळवार रोजी उज्वला पांगरकर रूजू झाल्या व पहिल्याच दिवशी कामकाज सुरू केले. याप्रसंगी तहसील कार्यालयातील कर्मचारी पदाधिकारी यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी नायब तहसीलदार मारोतराव जगताप, जे. जे.ईटकापल्ले, प्रविण जाधव, प्रदिप भोरे,अशोक गरूडकर, रामेश्वर सावते, विनोद बावस्कर, एल.एस.गायकवाड, अश्विनी देशपांडे, प्रणिता गवळे, ललिता पंजोल, विश्वांभर सोळंखे,बालाजी कडेकर आदींनी स्वागत केले.