अर्धापूरात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन

695
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती खा.प्रतापराव चिखलीकर,आ.राम पाटील रातोळीकर यांच्या उपस्थितीत अर्धापूर येथील भाजपा कार्यालयात साजरी करण्यात आली.
लोकनेते केंद्रीय ग्रामविकास मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,आ.राम पाटील रातोळीकर,भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड,ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, अ.नु.जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मारोती वाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख,भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अरूण सुकळकर,भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अदित्य शिरफुले,रमेशराव देशमुख, सुरेशराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष बाबूराव लंगडे, प्रल्हादराव माटे, शहराध्यक्ष विलास साबळे, माजी सैनिक माधवराव माटे, माजी जि. प. सदस्य रामराव भालेराव, सरचिटणीस अवधूत कदम, भाजयुमोचे जिल्हा चिटणीस योगेश हाळदे, अभिषेक गुरखुदे, गोविंद माटे, अजय बारसे,किशोर शहाणे,अ.हसीब अ.जलील, गोविंद लंगडे, सुनील बारसे,राजू होळकर,अजय बारसे, तुकाराम माटे,विशाल फाजगे,किशोर शहाणे,रूद्राजी सिनगारे,केशवराव साबळे, मुनिरखान, साहेब मोरे,विजयमाला लांडगे, कु.शितल मोरे, सौ.सुवर्णा हडपकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.