अर्धापूर तालुक्यातील कर्ज माफीतून वगळलेल्या शेतक-यांचे कर्ज माफ करा- भाजयुमोची मागणी.
सरसकट कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची शासनाकडून फसवणूक.
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.तर राज्य सरकार सांगते की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. पण प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.
राज्य सरकारने दिलेल्या शेतकरी कर्ज माफीच्या विविध योजनेतून अनेक शेतकऱ्यांना वगळले आहे. ज्या शेतकऱ्यांची २०१५,२०१६, २०१७ पासूनचे थकीत असलेले कर्ज सरकारने त्वरीत माफ करावे तसेच शेतक-यांना बँक अधिकारी थकीत कर्ज भरा म्हणून नोटीस देत असून शासनाने थकीत असलेल्या शेतक-यांचे कर्ज माफ करावे व शेतकऱ्यांना नवीन कर्ज तात्काळ वाटप करावे, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जठन पाटील मुळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड, तहसीलदार अर्धापूर
यांच्याकडे केली आहे.
यावेळी शेतकरी पंजाबराव मुळे, ज्ञानेश्वर जाधव, मारोती देशमुख, सुरेश कदम, संतोष गिरी, केशव गिरी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.