अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील शेतकऱ्याचा शाॅटसर्किटने ६ एकर ऊस जळाला; आगीत ८ लाखाचे नुकसान

महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे ८ लाखाचे नुकसान

380
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात विजेच्या तारांच्या स्पर्श होऊन शॉटसर्किटमुळे तब्बल ६ एकर ऊस जळाल्याची घटना दि.१९ बुधवारी रोजी दु. १ वा. घडली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
देळूब ता.अर्धापूर येथील शेतकरी बाबुराव हेंद्रे यांच्या शेतातील देळूब शिवारात गट क्र.२५४ मद्धे ६ एकर ऊसाच्या शेतात महावितरण कंपनीचे विद्युत पुरवठाचे खांब आहेत. यावेळी विद्युत पुरवठा सुरू होता. अचानकपणे विद्युत पुरवठाच्या ताराचा शाॅटसर्किट होऊन ऊसाच्या फडाला आग लागल्याने ऊसाने पेट घेतल्याने ऊसाचा फड जळून सहा एकर ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वीज वितरण कंपनीला न्यायालयात खेचू अशी प्रतिक्रिया शेतकरी बाबुराव हेंद्रे पाटील यांनी यावेळी दिली.
महावितरण कंपनीच्या विद्युत प्रवाहच्या तारा लोंबकळून ताराच्या स्पर्शाने ऊसाने पेट घेतला. शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण ६ एकर मधील ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे आठ लाखांचे नुकसान झाले आहे.विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी विज वितरण कंपनीने पावले उचलणे गरजेचे आहे. ऊस जळीत प्रकरणी मदत करावी अशी मागणी बालाजी हेंद्रे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.