अर्धापूर तालुक्यात भर पावसात पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन पिंपळगाव म.येथील पूरग्रस्त कुटूंबाचे केले सांत्वन..
पालकमंत्री अशोक चव्हाण थेट बांधावर.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
गेल्या काही दिवसांपासून अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांना पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भेट दिली व पिंपळगाव महादेव येथील पूरग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले.
आज दि.१ ऑक्टो शुक्रवार रोजी सायंकाळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव म.,लोणी बु.,खु.,लहान,आंबेगाव, बेरसर, शहापूर वाडी, आदी गावांना भेटी दिल्या. यावेळी प्रथम पिंपळगाव म.येथील पुरात वाहुन गेलेला मुलगा सुदर्शन इरबाजी झुंजारे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मदतीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन देत पूरग्रस्त कुटुंबीयांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सांत्वन केले. परिसरात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
काही दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांबरोबर सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून सर्व शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
पालकमंत्र्यांनी तालुक्यातील विविध गावांना रात्री उशिरा पर्यंत भेटी दिल्या यावेळी तालुक्यातील शेतक-यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी बहुतांश गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजय लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर,जिल्हा सचिव निळकंठ मदने, सुभाषराव देशमुख, संचालक आनंदराव कपाटे, सरपंच अमोल इंगळे,डॉ.उत्तमराव इंगळे, सुधाकर इंगळे, शेख मेहबूब, गोविंदराव हारकरी, मंगेश कु-हाडे, उपतालुका प्रमुख सदाशिव इंगळे, उपसरपंच भगवान पवार, माजी सरपंच सदाशिवराव देशमुख,वसंतराव कल्याणकर,सरपंच प्र.कपिल दुधमल, उद्धवराव कल्याणकर, संतोष कल्याणकर, उपनगराध्यक्ष डॉ.विशाल लंगडे, संचालक प्रविण देशमुख, विलास देशमुख, सरपंच रमेश क्षीरसागर,बालाजी क्षीरसागर,संचालक संजय लोणे, सरपंच अनूसयाबाई लोणे,सरपंच प्र.विजय पा.भुस्से, सरपंच अमोल डोंगरे, बाळू पाटील धूमाळ, राजाराम पवार,
माधवराव बुटले, राजू भुस्से, शंकर ढगे, संभाजी लोणे, भास्कर वैदे, राजू लोणे,चंद्रमुनी लोणे, उमाकांत सरोदे, प्रकाश लोणे विविध विभागाचे अधिकारी शेतकरी आदींची उपस्थिती होती.