अर्धापूर तालुक्यात मुसळधार पाऊस, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला…
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अर्धापूर तालुक्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली सर्वाधिक 130 मिलिमीटर पावसाची नोंद अर्धापूर तालुक्यात झाली आहे. तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे यामध्ये कोंढा,लहान, पिंपळगाव, पार्डी,शेनी,कामठा,मेंढला, सांगवी-खडकी सावरगाव, उमरी, बामणी, लोणी येथील लोणारी नदी तर शेलगाव येथील आसना नदी व तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे उमा नदीला महापूर आला आहे. यामुळे तालुक्यातील कापणीस आलेले सोयाबीन पुर्णपणे जमीनदोस्त झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेला आहे. शेतजमीनी सोबत सोयाबीन, ऊस, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.