काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम,वंचित,पीआरपी, वंचित, मनसे अपक्ष लागले कामाला.
अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १७ जागेसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून नगरपंचायत क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस मदान यांनी बुधवारी निवडणुकांची घोषणा केली आहे. अर्धापूर नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने नगरपंचायत क्षेत्रात बुधवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
दि.२९ डिसेंबर रोजी अर्धापूर नगरपंचायतची मुदत समाप्त होत आहे.१७ सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि.१ ते ७ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येईल दि.४ व ५ डिसेंबर रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ८ डिसेंबर रोजी. मतदान दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होईल.दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्या पासून मतमोजणी सुरू होणार आहे. अचानक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेकांची तारांबळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सर्वच राजकीय पक्ष तुल्यबळ उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरविण्यासाठी लागले कामाला तर अनेक उमेदवार आपल्या वार्डातून कसे विजयी होणार हे गणित पक्षश्रेष्ठीना दाखवून उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावण्यात मग्न आहेत.अनेकांना पक्षाने उमेदवारी न दिल्यास पक्ष नव्हे तर लक्ष नगरपंचायत म्हणून निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.