अर्धापूर नगरपंचायतीच्या १७ जागेसाठी तिसऱ्या दिवशी शिवसेना उमेदवाराचा एक अर्ज दाखल.

अर्धापूर नगरपंचायत निवडणूकीत बहुतांश वार्डात चौरंगी लढत होणार.

794
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर नगरपंचायतीची १७ जागेसाठी ३ री पंचवार्षिक निवडणूक २१ डिसेंबर रोजी पार पडणार असून या निवडणुकीत उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी शिवसेनेच्या सौ.पंचफुलाबाई येवले यांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी विकास माने, सहाय्यक निवडणूक निर्वाचन अधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार उज्वला पांगरकर, नायब तहसीदार मारोतराव जगताप, नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दिली आहे.
अर्धापूर नगरपंचायत निवडणूकीसाठी सर्वच पक्ष उमेदवार उभे करणार आहेत.याकडे राजकीय मंडळीचे लक्ष लागले आहे.काँग्रेस पक्षाचे नेतृत्व बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्ता मधून उमेदवारी देण्यासाठी शुक्रवारी रोजी काँग्रेसच्या कार्यालयात इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती आ.अमरनाध राजूरकर, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, उपमहापौर अब्दुल गफार, तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, उपनगराध्यक्ष डॉ.पल्लवी लंगडे, माजी उपनगराध्यक्ष पप्पू बेग, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायक, नगरसेवक गाजी काजी, शेख मकसूद, संघरत्न कंधारे, मुस्वीर खतीब, जुबेर गाजी, सय्यद मोहसीन, दिलीप डाहाळे, पंडित शेटे, व्यंकटराव साखरे, व्यंकटी राऊत, छत्रपती कानेडे, डॉ.शंकर कौठेकर, बाळू माटे, उमेश सरोदे, सोनाजी सरोदे, बबन लोखंडे,इमरान सिद्दीकी यांच्यासह  ७२ इच्छूक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.
भाजपाच्या उमेदवारांची आ.राम पाटील रातोळीकर यांच्या उपस्थितीत उमेदवारांची बैठक घेण्यात आली, यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मण इंगोले, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अरूण सुकळकर, विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख,तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,अशोक बुटले, प्रल्हाद माटे, बाबुराव लंगडे, विराज देशमुख, शहराध्यक्ष विलास साबळे, अवधूत कदम, नागोराव भांगे, योगेश हाळदे, तुकाराम साखरे, रमाकांत हिवराळे, शिवराज जाधव, अंगद मगनाळे, माजी सैनिक माधव माटे,अभि गुरखुदे, तुकाराम माटे, गोविंद माटे, राजू राऊत यांच्या उपस्थितीत युवा कार्यकर्ते सुनिल बारसे यांनी भाजपात प्रवेश केला.
शिवसेनेच्या सौ.पंचफुलाबाई येवले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जि.प.सदस्य बबनराव बारसे,उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील, तालुकाप्रमुख संतोष कपाटे, शहरप्रमुख सचिन येवले, उपतालुका प्रमुख सदाशिव इंगळे,कैलास कल्याणकर, अशोक डांगे, ओम नागलमे, काजी सल्लावोद्दीन, शेख रफिक यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
मनसेच्या सौ.कुसुमताई मस्के यांनी राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, तालुकाध्यक्ष उध्दवराव राजेगोरे, शेख साबेर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.