अर्धापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

काँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी, अपक्ष मैदानात उतरणार

497
अर्धापूर, नांदेड –
अर्धापुर नगरपंचायतीच्या ४ जागेसाठी १८ जानेवारी रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दि.३ सोमवार रोजी शेवटचा दिवस असल्याने या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम, अपक्ष मैदानात उतरणार असून या निवडणुकीसाठी ५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अर्धापूर नगरपंचायतीत ओबीसीसाठी आरक्षित असलेले वार्ड निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार खुल्या प्रवर्गासाठी करून महिला व खुले असे आरक्षण काढण्यात आले आहे.    वार्ड क्र.१ सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.९- सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.- ७ सर्वसाधारण, वार्ड क्र.- १६ सर्वसाधारण या जागेसाठी निवडणूक होत असल्याने या नगरपंचायत मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित व्हावे यासाठी भाजप, काँग्रेस, एमआयएम व राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. चार जागा सत्तेवर आणण्यासाठी किंगमेकरची भुमिका कोण बजावणार आहे तसेच या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
नगरपंचायत गेल्या १० वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असून या काळात शहरातील रस्ते, व्यापारी गाळे,स्मशानभूमीचे अर्धवट कामे या मुद्द्यांवर निवडणुक गाजणार असून व काही उमेदवारांनी तर पक्षाकडे अंतिम यादी न देता प्रारूप मतदार यादीच सादर केल्यामुळे या वरून जोरदार चर्चा शहरात होत आहे. तसेच अनेक उमेदवार जातीपातीचे आकडे सादर करून आपण कसे या वार्डातून निवडून येऊ शकतो याचे गणित मांडणी करत आहे.या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळवण्यासाठी उमेदवाराकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन होणार असल्याची खमंग चर्चा अर्धापूरात होत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील ४ जागांसाठी नगरपंचायत निवडणूक चांगलीच गाजणार
पहिल्या टप्प्यातील नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी जोरदार चुरशीच्या निवडणूक झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील ४ जागासाठी काँग्रेसकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूरात पूर्ण शक्ती पणाला लावून निवडणूक जिंकण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.तर भाजपाकडून उमेदवारांना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रभारी आ.राम पाटील आदींनी लक्ष देऊन उमेदवार निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीची व्युव्हरचना आखण्यात येत असल्याची माहिती भाजपाकडून मिळत आहे.तसेच शिवसेना या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील, तालुकाप्रमुख संतोष कपाटे, शहरप्रमुख सचिन येवले आदी नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी कामाला लागले असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धवराव राजेगोरे, जिल्हा संघटक आत्माराम कपाटे, ॲड.सचिन देशमुख,ॲड.सचिन जाधव, युवकचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत टेकाळे, युवकचे शहराध्यक्ष संदिप राऊत, प्रभारी ओमप्रकाश पत्रे, साबीर शेख आदी नगरपंचायत निवडणुकीची तयारी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.