अर्धापूर नगरपंचायतीच्या 4 जागेसाठी आज मतदान ;२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

4 जागेसाठी 4786 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

835
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी आज १८ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने ४ वार्डाची निवडणूक मोठ्या चुरशीची होत आहे. नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ४ जागेसाठी ४७८६ मतदार मंगळवारी सकाळी ७-३० ते ५-३० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अर्धापूर नगरपंचायतींच्या ४ जागेसाठी आज दि.१८ मंगळवारी रोजी मतदान होणार असून पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक अधिकारी विकास माने, सहाय्यक किरण अंबेकर, तहसीलदार उज्वला पांगरकर ,नायब तहसीलदार मारोतराव जगताप, नागनाथ देशमुख, विजय गंधनवाड,  गिरीश गलांडे आदी परिश्रम घेत आहेत.

चार वार्डात कुठे चौरंगी तर कुठे बहुरंगी लढत होत असून वार्ड क्र.१ भाजपा सौ.गयाबाई भिसे, काँग्रेस सौ.शालिनी व्यंकटेश शेटे, वंचित श्रीमंती सखुबाई शिनगारे, बीएसपी पवार अशी चौरंगी लढत होत आहे.वार्ड क्र.७ काँग्रेस छत्रपती कानोडे, भाजपा सौ.लक्ष्मीबाई साखरे, शिवसेना ओमप्रकाश नागलमे, अपक्ष ओमप्रकाश पत्रे अशी चौरंगी लढत होत आहे.वार्ड क्र.९ भाजपा सौ.अनुराधा माटे, काँग्रेस सौ.मिनाक्षी राऊत, राष्ट्रवादी रूख्मीणबाई नवले, एमआयएम सौ.खंडागळे अशी लढत होत आहे. वार्ड क्र.१६ मध्ये १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून  काँग्रेसचे सलिम कुरेशी,भाजपा चंद्रकला घुले, राष्ट्रवादी शेख नसीर, बीएसपी सुनिल पवार, एमआयएम शमीम बेगम गु.हक्कानी, अपक्ष खंदारे संदेश, अब्दुल शाकीर अब्दुल करीम, स.एजाज स.ईस्हाख, कोल्हे विशाल, म.अतीख म.यूसूफ, राजू छापेवार,परवेज पटेल, साबळे रामेश्वर अशी बहुरंगी लढत होणार असल्याने या वॉर्डात सर्वांत जास्त उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

पहील्या टप्प्यातील नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी निवडणुका जोरदार चुरशीच्या झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील नगरपंचायत निवडणूका ज्या प्रमाणे मतदारांना लक्ष्मीदर्शन व्हावे तसे झाले नसल्याने मतदार कोणत्या उमेदवारांना झुकते माप देईल याचे चित्र मतमोजणीत दि.१९ बुधवारी रोजी स्पष्ट होणार आहे. अनेक उमेदवारांनी आपणच विजयी होणार यासाठी देव देवताकडे नवस केले असल्याची जोरदार चर्चा गुलाबी थंडीत होत आहे.१७ जागे पैकी काँग्रेस, भाजपा, एमआयएम, अपक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित, बीएसपी यासह अनेक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते भविष्यातील आव्हाने कशा पध्दतीने पेलवतील या निकालावर बरेच काही अवलंबून आहे.

४७८६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

वार्ड क्र.१ पुरुष ७५४ स्त्री ७११ एकूण १४६५,
वार्ड क्र.७ पुरुष ५३८ स्त्री ५१९ एकूण १०५७,
वार्ड क्र.९ पुरुष ५८० स्त्री ५५७ एकूण ११३७,
वार्ड क्र.१६ पुरुष ५७६ स्त्री ५५१ एकूण ११२७
असे ४ वार्डात पुरुष २४४८ व स्त्रिया २३३८ असे ४७८६ मतदार दि.१८ मंगळवारी रोजी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

वार्ड क्र.१६ मध्ये चोख पोलिस बंदोबस्त तैनात

वार्ड क्रमांक १६ मध्ये १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने संवेदनशील मतदान केंद्रावर तब्बल ३० पोलिस कर्मचाऱ्यांचा चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.