अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना १७ उमेदवार उभे करणार- शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद पाटील बोंढारकर यांची माहिती.

469
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
आगामी अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना १७ जागी स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याची माहिती दि.२५ गुरूवारी रोजी पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांनी दिली आहे.
अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर,जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख बालाजी कल्याणकर,तालुकाप्रमुख संतोष कपाटे, माजी जि.प.सदस्य नागोराव इंगोले, उपसभापती अशोक कपाटे, शहर प्रमुख सचिन येवले यांनी घेतली असून आगामी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे १७ उमेदवार रिंगणात उतरणार असून नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा दिल्यास कोणत्याही राजकीय पक्षा सोबत युतीसाठी चर्चेचे दरवाजे खुले असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर यांनी दिली आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख सदाशिव पाटील इंगळे, कैलास कल्याणकर,अशोक डांगे,चेतन कल्याणकर, संतोष कदम, कपिल कदम, ओम नागलमे,शेख रफीक, उपशहरप्रमुख शिवप्रसाद दाळपूसे, बाबुराव चौरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.