अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत आरक्षणाची फ्री हिटची कोणाला मिळणार संधी.!

विजयाची संख्या वाढविण्यासाठी सर्वच स्वबळावर

1,071
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर नगरपंचायत निवडणूक मोठ्या चुरशीची होत असून दिग्गज नेत्यांनी अर्धापूर शहरात तळ ठोकला असल्याने आता अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीला वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील चार जागेवर विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे.ओबीसी आरक्षण रद्द होऊन त्या जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले आहे. आरक्षणाच्या या फ्री हिटची कोणाला संधी मिळणार याची चर्चा जोरदार रंगली आहे.
अर्धापूर नगरपंचायतीत ओबीसीसाठी आरक्षित असलेले वार्ड निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार खुल्या प्रवर्गासाठी करून महिला व खुले असे आरक्षण काढण्यात आले आहे. वार्ड क्र.१ सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.९- सर्व साधारण महिला, वार्ड क्र.- ७ सर्व साधारण, वार्ड क्र.-१६ सर्व साधारण असे आरक्षण सुटलेले आहे. तर नगरपंचायत मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित व्हावे यासाठी भाजप काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
अर्धापूर नगरपंचायतींच्या ४ वार्डासाठी निवडणूक चुरशीची होणार आहे. नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी निवडणूका मोठ्या चुरशीच्या झाल्यामुळे अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली असल्याने दि.२१ रोजी मतदान झाले असून ४ जागेवरील उमेदवारांना विजयी करून घेण्यासाठी अनेकजण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मोर्चे बांधणी करत आहेत. नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे असुन अर्ज सादर करण्याची मुदत २९ डिसेंबर ते ३ जानेवारी (सुटी वगळून), अर्ज छाननी व वैध अर्जाची यादी दि. ४ जानेवारी व अर्ज मागे घेण्याची मुदत दि.१० जानेवारी, मतदान दि.१८ जानेवारी तर मतमोजणी व निकाल दि.१९ जानेवारी रोजी असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

 

चार जागी कोण मारणार बाजी
नगरपंचायत निवडणुकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण अर्धापूरात तळ ठोकून उमेदवारांना मोठ्या प्रमाणात रसद पुरवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर भाजपा उमेदवारांना पक्षाकडून तुटपुंजी यंत्रणा मिळाली असून या ४ जागांसाठी “तुम लढो, हम दुरसे देखते है” अशी म्हणायची वेळ न येण्यासाठी पक्षाने यंत्रणा कामाला लावण्यासाठी वरीष्ठ नेत्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.