अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीच्या १७ जागेचा निकाल जाहीर

काँग्रेस १०, एमआयएम ३, भाजपा २, राष्ट्रवादी १, अपक्ष १

1,463

सखाराम क्षीरसागर,

अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर  नगरपंचायतच्या १७ जागेसाठी दि.१९ बुधवारी रोजी सकाळी मतमोजणी सुरुवात झाली होती. काँग्रेस १०,एमआयएम ३,भाजपा २,राष्ट्रवादी १,अपक्ष १ असा निकाल जाहीर निवडणूक निर्वाचन अधिकारी यांनी जाहीर केले.

अर्धापूर नगरपंचायत निवडणूकीच्या धक्कादायक निकाल जाहीर झाले आहेत. या नगरपंचायत निवडणूकीत अनेक दिग्गजांचा धक्कादायक पराभव झाला आहे. यामुळे आगामी काळात पक्षात मोठ्या प्रमाणात आत्मनिरीक्षण करून पक्ष बांधणी करत की टांगा पलटी घोडे फरार अशी अवस्था तर होणार नाही याची दखल वरील नेते मंडळींनी घेणे गरजेचे आहे.

मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली

अर्धापूर येथील नगरपंचायतींच्या १७ वार्डची मतदान मतमोजणी प्रक्रिया पार पडण्यासाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी विकास माने,निवडणूक साहाय्यक अधिकारी किरण अंबेकर,तहसीलदार उज्वला पांगरकर,नायब तहसीलदार मारोतराव जगताप,मुख्याधिकारी शैलेश फडसे,नगरपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवी,पोउनी साईनाथ सुरवशे, पोउनि कपिल आगलावे,पोउनी बळीराम राठोड, भिमराव राठोड,पोउनी तय्यब आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी विजयी उमेदवारांनी जल्लोष करीत आनंद उत्सव साजरा करीत आहेत

विजयी उमेदवार –

वॉर्ड क्र-1
शालिनी राजेश्वर शेटे (काँग्रेस विजयी)
वॉर्ड क्र-२
बाबुराव लंगडे (भाजपा विजयी)
वॉर्ड क्र-३
शेख जाकेर (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र-४
डॉ.पल्लवी विशाल लंगडे (काँग्रेस)
वॉर्ड क्र-५
कान्होपात्रा प्रल्हाद माटे (भाजपा)
वॉर्ड क्र-६
सोनाजी सरोदे (काँग्रेस )
वॉर्ड क्र-७
छत्रपती कानोडे (काँग्रेस)
वॉर्ड क्र-८
वैशाली प्रवीण देशमुख (काँग्रेस)
वॉर्ड क्र-९
मिनाक्षी व्यंकटी राऊत (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१०
मुख्तेदर खान पठाण (अपक्ष)
वॉर्ड क्र-११
साहेरा बेगम काजी (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१२
यास्मिन सुलताना मुसब्बीर खतीब (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१३
मिर्झा शहबाज बेग(एमआयएम)
वॉर्ड क्र-१४
रोहिणी इंगोले (एमआयएम)
वॉर्ड क्र-१५
आतिख रेहमान (एमआयएम)
वॉर्ड क्र-१६
सलीम कुरेशी (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१७
नामदेव सरोदे (काँग्रेस)

Leave A Reply

Your email address will not be published.