अर्धापूर नगरपंचायत १७ जागेसाठी ९० उमेदवार निवडणुकीच्याच्या रिंगणात; दुसऱ्या टप्प्यातील ४ जागेेेसाठी ३९०८ मतदारांनी केले मतदान

989
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –

● अर्धापूर नगरपंचायत उद्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला…!

● अर्धापूर नगरपंचायतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लागले जनतेचे लक्ष?

● नगरपंचायत निवडणुकीत कोणाचे पारडे जड होणार; राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात समर्थक मग्न

अर्धापूर नगरपंचायतीच्या ४ जागेसाठी आज दि.१८ मंगळवार रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानाची टक्केवारी चांगल्या प्रकारे झाली आहे. नगरपंचायतीसाठी ओबीसी जागा वगळल्याने ४ जागांची निवडणूक खुल्या प्रवर्गातुन पार पडली.एकूण १७ पैकी १३ जागेचे मतदान २१ डिसेंबर रोजी झाले तर ४ जागेसाठी आज दि.१८ मंगळवारी रोजी दुसऱ्या टप्प्यातील शांततेत मतदान झाले.

अर्धापूर येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदानास सुरुवात केली तर मतदान कर्मचारी, अधिकाऱ्यांनीही कर्तव्य बजावत निवडणूक कार्यक्रम व्यवस्थितरीत्या पार पाडले. अर्धापूर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. एकूण ४ हजार ७८६ मतदानापैकी ३ हजार ९०८ मतदान झाले असून प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वाधिक १२३५ मतदान तर प्रभाग क्रमांक ७ मध्ये सर्वात कमी ८६१ मतदान झाले आहे. पुरुष २०३४ स्त्री १८७४ एकूण ३९०८ असे मतदान झाले आहे.

मतदान प्रक्रिया पडली शांततेत पार

अर्धापूर येथील नगरपंचायतीच्या चार वार्डची मतदान प्रक्रिया पार पडली निवडणूक व उपविभागीय अधिकारी विकास माने, निवडणूक सहाय्यक अधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार उज्वला पांगरकर,नायब तहसीलदार मारोतराव जगताप, मुख्याधिकारी शैलेश फडसे, नगरपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवी, पोउनी साईनाथ सुरवशे, पोउनि कपिल आगलावे, पोउनी बळीराम राठोड, भिमराव राठोड, पोउनी तय्यब आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

अर्धापूर नगरपंचायत निवडणूक मतदान…!

प्रभाग क्रमांक १- पुरुष ६२९, स्त्री ६०६ असे एकूण १२३५

प्रभाग क्रमांक ७- पुरुष ४५२, स्त्री ४०९ एकूण ८६१

प्रभाग क्रमांक ९- पुरुष ४८७, स्त्री ४२५ एकूण- ९१२

प्रभाग क्रमांक १६- पुरुष ४६६, स्त्री ४३४ एकूण ९००

अर्धापूर नगरपंचायतींच्या ९० उमेदवारांच्या भवितव्याचा उद्या निकाल

नगरपंचायत निवडणुकीसाठी २१ डिसेंबर रोजी १३ जागेसाठी ६५ उमेदवार निवडणूकीच्या मैदानात होते.तर आज दि. १८ मंगळवार रोजी ४ जागेसाठी २५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. अशा एकूण ९० उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला दि.१९ बुधवारी रोजी होणार असल्याने दुसऱ्या टप्प्यातील ८१%६५ टक्के मतदान झाले असल्याने वाढलेल्या टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे उमेदवारासह समर्थकांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.