अर्धापूर, नायगाव, माहूर नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येणार-आ.अमरनाथ राजूरकर

444
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
आरएसएस आणि केंद्र सरकारची भूमिका आरक्षण संपविण्याची आहे, केंद्र सरकारच्या धोरणामुळे ओबीसी वर्गाचे आरक्षण गेले आहे. काँग्रेस पक्ष व आमचे नेते पालकमंत्री अशोक चव्हाण आम्ही ओबीसींच्या सोबत आहोत.काँग्रेस पक्षाने नगरपंचायतच्या चारही सर्वसाधारण जागेवर ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार दिले आहे. अर्धापूर, नायगाव, माहूर नगरपंचायतीवर काँग्रेसची बहुमताने सत्ता येईल असा विश्वास विधानपरिषदेचे काँग्रेसचे आ.अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते पत्रकारांशी बोलतांना होते. यावेळी पक्ष निरीक्षक तथा मनपा स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, माजी उपनगराध्यक्ष मिर्झा अख्तर उल्ला बेग, माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, युवक विधानसभा अध्यक्ष मारुती शंखतीर्थकर, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायक आदीची उपस्थिती होती.
यावेळी आ.अमरनाथ राजूरकर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, काँग्रेस पक्ष ओबीसी सोबत आहे. बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे अर्धापूर नगरपंचायतीच्या चारही जागा ओबीसीसाठी सोडण्यात आल्या होत्या आरक्षण रद्द झाल्याने त्या फेर सोडतीमध्ये सर्वसाधारण गटासाठी सोडत झाली या चारही जागेवर ओबीसी प्रवर्गातून उमेदवार दिले आहेत. वार्ड क्र.1) सौ.शालिनी शेटे, 7)पुंडलिक कानोडे, 9)सौ.मीनाक्षी राऊत, 16) सलीम कुरेशी यांना उमेदवारी दिली आहे. या चारही जागेसह काँग्रेस संपूर्ण 17 जागा विकासाच्या मुद्द्यावर जिंकून अर्धापूर नगरपंचायतीवर विजयाची हॅट्रिक करून सत्ता स्थापन करू असा ठाम विश्वास व्यक्त केला तर ना.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अर्धापूर, नायगाव,माहूर नगरपंचायतीवर काँग्रेस पक्षाची सत्ता एक हाती येणार असून शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल सांडपाण्यासाठी ड्रेनेज लाईन, रस्त्यांची कामे, तलाव दुरुस्तीचे काम ग्रामीण रुग्णालय, दिवाबत्ती स्मशानभूमीची कामे ही मोठ्या प्रमाणावर केली. यापुढील काळात तलावाचे सुशोभीकरण असेल कन्या शाळाचे भव्य इमारत बांधकाम, गोरगरिबांचे घरकुलाचे प्रश्न, राशन कार्ड असून राशन मिळत नाही त्यांना राशन मिळवून देणे ही कामे प्राधान्याने सोडविले जातील. अर्धापूर शहरातील कामे प्राधान्याने केली, हे सर्व जनतेला माहीत आहे आणि जनता नेहमी नेते अशोकराव चव्हाण यांच्या विकास कामाला साथ देत आली आहे. आगामी काळातील विकास कामे करण्यासाठी ओबीसी वंचित घटकांच्या हक्क अधिकारासाठी आमचे प्राधान्य राहील तेव्हा जनतेने अशोकरावांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन आमदार अमरनाथ राजूरकर यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधताना केले आहे.
यावेळी पंडीतराव लंगडे, नगरसेवक गाजी काजी,जुबेर काजी,शेरू पठाण, मुमताज पटेल, निळकंठ मदने,प्रवीण देशमुख, मनसब खान, आर.आर.देशमुख, छत्रपती कानोडे, व्यंकटी राऊत, कामाजी अटकोरे, दिलीप डाढाळे, बाळू माटे, राजू कल्याणकर, सोनाजी सरोदे, अबुजर बेग, राजू पाटील, बबन लोखंडे,सोशल मीडियाचे शेख मकसूद यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.