अर्धापूर पं.स.येथे १५ वा वित्त आयोग कार्यशाळा संपन्न.

1,191

सखाराम क्षीरसागर,

अर्धापूर – राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती अर्धापूर यांच्या वतीने आमचा गाव आमचा विकास ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी तालुका स्तरीय सरपंच व ग्रामसेवक यांची कार्यशाळा तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.

कार्यशाळेचे उदघाटन संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ. कांताबाई अशोकराव सावंत, उदघाटक म्हणून जि.प.सदस्य बबनराव बारसे प्रमुख उपस्थिती उपसभापती अशोकराव कपाटे,प.स.सदस्या सौ.मंगलताई शिवलिंग स्वामी गटविकास अधिकारी डि.एस. कदम,नायब तहसीलदार ईटाकापले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, ग.शि.अ.रुस्तुम संसाने॓, बाविप्रअ मयुरी पुणे,अशोकराव सावंत,माजी सरपंच शिवलिंग स्वामी,यशदा प्रशिक्षक आईलवार, प्रा.शिरसाठ आदी मान्यवर होते.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रस्ताविक डॉ.एस.पी.गोखले यांनी केले. त्यानंतर प्रमुख मान्यवर यांनी आमचं गाव आमचा विकास ग्रामपंचायत विकास आराखड्यात कोणत्या कामांचे समावेश करण्यात यावेत या बाबतीत कार्यशाळेला मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने पहिल्या सत्रातील कार्यक्रम संपन्न करण्यात आले. १५ व्या वित्त आयोगाचे आराखडे कसे तयार करायचे या बाबतीत केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयाबद्दल मार्गदर्शन व प्रशिक्षण,आमचं गाव आमचा विकास ग्रामपंचायत विकास आराखडा कशा पध्दतीने तयार करायचे या बाबतीत यशदा प्रशिक्षक यांनी मार्गदर्शन केले आहे. १५ व्या वित्त आयोग विविध विभागाला स्थानिक ग्रामपंचायत कडून निधी कुठल्या बाबींवर खर्च करायचे या बाबत तालुका स्तरावरील विभाग प्रमुख डॉ. विद्या झिने तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम ससाने,मयुरी पुणे बालविकास प्रकल्प अधिकारी, नरेगा बाबतीत साधना कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.शेवटी ग्रामपंचायत विकास आराखडा मागच्या वर्षी तयार करण्यात आलेले १४ व्या वित्त आयोग व १५ व्या वित्त आयोग या बाबतीत अनुभव व मार्गदर्शन उपस्थित सरपंचांनी केले. गटविकास अधिकारी डि. एस.कदम यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचा समारोप झाला.

यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील चव्हाण,संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष भगवान कदम, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल इंगोले, सौ.मनिषा खंडागळे, सरपंच प्रतिनिधी अमोल डोंगरे, युवा सेनेचे सतीश पाटील पांगरीकर, दत्ता नादरे, कपिल दुधमल, उपसरपंच शेख महेबूब, विजय भुस्से, सरपंच सौ.कांचनताई कुलदीप सुर्यवंशी, सौ. शिल्पा साहेबराव कदम, दत्ता पाटील नवले, पंजाब राजेगोरे, उपसरपंच भगवान पवार यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच व उपसरपंच, प्रतिनिधी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी डॉ.एस.पी.गोखले यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी व्हि.एम.मुंडकर यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती अर्धापूर अधिक्षक लव्हेकर, हंगे मॅडम , कांबळे मॅडम, निकम, गजभारे, ईटकापले, पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेे.

Leave A Reply

Your email address will not be published.