अर्धापूर येथे गणेश मंडळाच्या वतीने कोविड लसीकरण मोहीमेचे आयोजन.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील गणपुर येथील दोन गणेश मंडळाच्या वतीने दि.१४ सप्टें मंगळवारी रोजी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली, यात १६० जणांनी लस घेतली असल्याची माहिती गणेश मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
अर्धापूर तालुक्यात श्रीगणेश उत्सवात सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक श्री गणेश मंडळ गणपुर, अध्यक्ष माधव दत्तराव खुळे व जय भवानी गणेश मंडळ, अध्यक्ष साईनाथ होनाजी काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास धनगे, डॉ.शिंगरवाड, सरपंच संतोष खराबे, उपसरपंच विठ्ठल पाटील बंडाळे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव बंडाळे, माजी उपसरपंच परसराम खुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोविड लसीकरण मोहीमेस सुरूवात करण्यात आली. यावेळी १६० जणांनी कोविड लस घेतली, लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ.लीना बनसोडे, अरुण गादगे,आरोग्य सेविका श्रीमती जी.एस.खुळे, सुधाकर बंडाळे, गणेश बंडाळे,आश्विन खुळे, दिगंबर बंडाळे, पंडितराव बंडाळे आदींनी परिश्रम घेतले.