अर्धापूर येथे रासेयोच्या वतीने सिकलसेल तपासणी व कोविड 19 लसीकरण शिबिराचे आयोजन.

599

सखाराम क्षीरसागर

अर्धापूर, नांदेड –

राष्ट्रीय युवा स्वास्थ्य मिशन अंतर्गत सिकलसेल तपासणी शिबिर व कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन शंकरराव चव्हाण महाविद्यालय,अर्धापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. तसेच कोविड लसीकरणचे दुसरे शिबिर महाविद्यालयामध्ये घेण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के.के.पाटील हे होते तर उद्घाटक म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विद्या झिणे उपस्थित होते.यावेळी अनेकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लसीकरण करण्यासाठी एन.एम. टेकाळे, टी.व्ही.सोनवणे टी.बी पर्यवेक्षक, साखरे ए.बी.कुष्ठरोग पर्यवेक्षक, डी.एस.यरलवार, शेख एजाज, सिकल्सेल पर्यवेक्षक, डॉ.विक्रम कुंटुरवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रघुनाथ शेटे, डॉ. केंद्रे के.एल.व आरोग्य कर्मचारी एन.एस.मेंडके यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.के.ए. नजम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.आर.बी.शेटे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले.तर आभार डॉ.पठाण यांनी मानले.सदरील शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ.हनुमंत भोपाळे लिखित यशाचा राजमार्ग हा ग्रंथ कोविड-19 लस घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी भेट दिला.या शिबिरासाठी प्रकाश देशमुख, प्रा राम राजेगोरे, डॉ जाकेर इनामदार, प्रा.निरंजन पतंगे यांनी विशेष तर महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.