अर्धापूर शहरातील नागरिकांनी कोविड लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा-प्रशासनाचे आवाहन.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर शहरातील नागरीकांनी मिशन कवच कुंडल अंतर्गत सर्व जनतेने कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासकीय बैठकीत केले आहे.तहसीलच्या सभागृहात सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
अर्धापुर तालुक्यातील ग्रामीण भागातील १८ व त्यावरील वयोगटातील जनतेचे लसीकरण हे ८७% झाले आहे परंतु शहरामध्ये केवळ ४७% झालेले आहे. शहरामधील जनतेने कोवीड लसीकरण करून घेण्यासाठी मिशन कवच कुंडल अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन जनतेने जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपले कोवीड लसीकरण करून घ्यावे. कोविड-१९ आजारावर मात करण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण टाळण्या साठी लस हे प्रभावी माध्यम आहे आहे. १)कोव्हीड लस सुरक्षित आहे लस घेतल्याने कोव्हीड आजारचा प्रसार होणार नाही २)रुग्ण गंभीर आजाराचे लक्षणे दिसणार नाही.३) रुग्णाने लस घेतल्याने ७०% ते ८०% रोग प्रतीकार शक्ती वाढते कोरोना विषाणू पासून संरक्षण करते. शहरातील सर्व नगरसेवक,ग्रामीण भागातील जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे सदस्य व प्रतिष्ठीत व्यक्ती यांनी लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तालुका कोविड टास्क फोर्सचा वतीने करण्यात आले आहे.
यावेळी तहसीलदार उज्वला पांगरकर, गटविकास अधिकारी मिना रावताळे, मुख्याधिकारी शैलेश फडसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विद्या झिने, पोलिस निरीक्षक अशोक जाधव,नायब तहसीलदार मारोतराव जगताप, विस्तार अधिकारी एस.पी.गोखले, बालविकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, गट शिक्षण अधिकारी रूस्तूम ससाणे, शिक्षण अधिकारी गंगाधर राठोड यांनी आवाहन केले आहे.