अवैधरित्या माती, दगड व मुरूम उत्खनन करणाऱ्या गुत्तेदार व तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची कोत्तेवार यांची मागणी.

374
नायगाव, नांदेड –
मौजे मुगाव येथील गट क्रमांक ५७२ मधून शासनाची कोणतीच परवानगी न घेता मशीनीद्वारे हजारो ब्रास मुरूम ब्लास्ट करून प्रचंड प्रमाणात दगड उत्खनन करण्यात आले आहे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वरिष्ठांनी सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित गुत्तेदार व तलाठी यांच्यावर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोत्तेवार होटाळकर यांनी‌ जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

मौजे बावलगाव ते डोंगरगाव अंतर्गत होत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी मुगाव येथील गट क्रमांक ५७२ मधील उत्खनन केलेले दगड वापरण्यात आले आहे. गट क्रमांक ५७२ मध्ये उत्खनन करत असताना गुत्तेदाराने कुठलीच परवानगी घेतली नाही. येथील संबंधित तलाठी व गुत्तेदारांच्या संगनमताने हा प्रकार चालू असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे, यामुळे सदर प्रकरणाची इ.टी.एस‌.मशीनद्वारे चौकशी करून शासनाने ठरवून दिलेल्या किंमती पेक्षा पाच पट दंड वसूल करण्यात यावा व संबंधित गुत्तेदार व तलाठी यांच्यावर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोत्तेवार होटाळकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.