अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्या- करिता मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्या आदेशान्वये हदगाव उपविभागातील अवैध गौण खनिज वाहतुकीस आळा घालण्याकरिता हदगाव उपविभाग स्तरावर एकूण 32 भरारी पथके उपविभागीय अधिकारी यांनी स्थापन केली आहेत. सदरील भरारी पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यासह अनेक तालुका स्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तसेच पथकास सहायक म्हणून मंडळ अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी,विस्तार अधिकारी, तलाठी व कृषिसहाय्यक/कृषिसेवक यांचाही समावेश करण्यात आला आहे. एकूण 32 भरारी पथकापैंकी दररोज 02 पथके हदगाव तालुका व 02 पथके हिमायतनगर तालुका असे 04 पथके दररोज गस्त घालून अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने पकडून दंडात्मक व जप्तीची कार्यवाही करणार आहेत. तसेच प्रत्येक भरारी पथकासोबत शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त ही देण्यात आला आहे.