अवैध दारू व शिंदी विक्री करणाऱ्यांवर रामतिर्थ पोलिसांनी छापा टाकून ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल केला जप्त; चौघांविरोधात गुन्हा दाखल.
नायगाव, नांदेड –
रामतिर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारू व शिंदी विकत असल्याची गुप्त माहीती रामतिर्थ पोलिसांना कळताच चौघांना पकडून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीती नुसार दि.१२ आक्टोंबर रोजी नरसी येथे अवैध शिंदीची विक्री करत असताना रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि विजय जाधव यांनी छापा टाकला असता आरोपी अनुसयाबाई राठोड नरसी ता.नायगाव त्यांच्याकडे ३५२०/- रूपये किमतीची शिंदी जप्त करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुस-या घटनेत जिगळा येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी ६०००/–रूपये किमतीची शिंदी जप्त करून आरोपी सोनाबाई अशोक जाधव रा. जिगळा ता.बिलोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिस-या घटनेत आदमपुर फाटा येथे मोटारसायकल वरून देशी दारूचे बाॅक्स घेउन जाताना छापा टाकला असता त्या ठिकाणी ११५२० रूपये किंमतीची देशी दारू व २०००० रूपये किंमतीची मोटारसायकल जप्त करून आरोपी विष्णु पिराजी पवार रा.बिलोली व शेख अबू शेख वाहेद रा.बिलोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सपोनि विजय जाधव यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक लतीफ शेख़ हे करत आहेत. सदरची कामगिरी बिट जमादार ईंगळे पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आडे, बोडके यांनी केली आहे.सर्व सामान्य नागरीकांकडून पोलीसांच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.