आंबेडकरवादी ‘मिशन’ अभ्यासकेंद्रात रविवारी प्रकाशन आणि गौरव सोहळा.
नांदेड –
नांदेड शहरातील नामवंत कॉर्डीयोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ सोनकांबळे यांनी लिहिलेल्या ‘पेटलेली माणसे’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा तसेच बोधी फाउंडेशनचा बोधी ‘जीवन’गौरव पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. सिडको, नांदेड येथील आंबेडकरवादी ‘मिशन’ अभ्यास केंद्रात आयोजित करण्यात आला आहे.
नांदेडच्या सिडको परिसरातील आंबेडकरवादी ‘मिशन’ अभ्यास केंद्रात दि. २८ नोव्हेंबर रोजी आयोजित सोहळ्या दरम्यान, ‘बोधी’ फाउंडेशनच्या वतीने श्रमिक मुक्तीदलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना बोधी ‘जीवन’गौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ‘स्वाराती’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उध्दव भोसले, नांदेडचे माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्यासह नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.पुंडलिक तथा डॉ.पी.टी. जमदाडे, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.संग्राम जोंधळे, सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.डॉ.अनंत राऊत, उत्तम सोनकांबळे (सहसंचालक कोषागार औ’बाद.), सेवानिवृत्त ‘आरटीओ’ अनिलकुमार बस्ते, डॉ.जी. ए. गायकवाड, फुले-शाहू- आंबेडकरवादी चळवळीतील सुप्रसिद्ध अभ्यासक धम्मसंगिनी रमागोरख, डॉ.विनायक मुंडे, डॉ. यशवंत चव्हाण, प्रा.डॉ. रत्नदीप सोनकांबळे व आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक कदम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय, या सोहळ्यास डॉ.अशोक धबाले, डॉ.दिलीप फुगारे, डॉ. विद्याधर केळकर, डॉ.एस. आर. लोणीकर, डॉ.अनंत सूर्यवंशी, डॉ.दिलीप कंधारे, डॉ.नितीन पाईकराव, डॉ. विठ्ठल भुरके, डॉ.उत्तम इंगोले, डॉ.प्रशांत गजभारे, डॉ. इरवंत पल्लेवाड, डॉ.अनिल देगावकर, डॉ.रमेश बनसोडे, डॉ.उत्तमराव मोरे, डॉ.धम्मपाल कदम, डॉ.श्याम दवणे, डॉ.त्रिशला धबाले, डॉ.स्मिता पाईकराव, डॉ.वंदना कंधारे, डॉ.प्रिती कदम, डॉ.कंचन धुळे, डॉ.शितल सोनकांबळे, डॉ. कैलाश धुळे, डॉ.शिवाजी कागडे, डॉ.सुधीरकुमार कांबळे व डॉ.प्रमोद अंबाळकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
विशेष बाब म्हणजे, आंबेडकरवादी ‘मिशन’ केंद्राच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील व बौद्ध समाजातील पहिले सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर डॉ.सिद्धार्थ सोनकांबळे यांचा उपरोक्त सोहळ्यात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यास नांदेड शहर व नवीन नांदेड परिसरातील बहुजन समाज बांधवांसह विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक दीपक कदम यांच्यासह देगलूर येथील माजी नगरसेवक वाय.जी. सोनकांबळे आणि इंजिनिअर एन.बी.मोडक व त्यांच्या सर्व सहकारी बांधवांनी केले आहे.