आगामी अर्धापूर नगरपंचायत निवडणूकीसाठी उद्या आरक्षण सोडत.

आजी-माजी नगरसेवक 'मी पुन्हा येईन' म्हणत, लागले मोर्चे बांधणीला.

506
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
आगामी काळात होणाऱ्या अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत दि. १२ शुक्रवारी रोजी ११ वाजता तहसील कार्यालय येथे होणार असून या आरक्षण सोडतमध्ये १७ जागा पैकी ९ महिला राखीव तर ५ जागा ओबीसीसाठी राखीव असून त्यापैकी ओबीसी ३ जागा महिलांसाठी तर २ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने सर्व साधारणसाठी व एक महिलांसाठी याप्रमाणे कोणकोणत्या वार्डात कोणासाठी आरक्षण सुटेल याकडे भावी नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.अनेक आजी, माजी नगरसेवक म्हणतात की, विकासाच्या जोरावर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन तर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर होताच इच्छूक उमेदवार कामाला लागणार असून आगामी काळात बहुतांश वार्डात एकास एकच उमेदवार राहणार असल्याने नगरपंचायत निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत १७ प्रभागातून १७ नगरसेवक अशी निवडणूक होणार असल्याने एका वार्डात एकच उमेदवार मैदानात राहणार असल्याने या निवडणूका चुरशीच्या होणार आहेत.अनेक इच्छुक नवनवीन युक्त्या घेऊन मतदारांच्या संपर्कात जात आहेत. या निवडणुकीत मागील पाच वर्षांत वार्डात किती विकास कामे केली याची माहिती जनतेला दिल्यावरच जनता निवडणूकीत मतदान करणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमताने जनतेने निवडून दिले होते.
आगामी निवडणूक सत्ताधाऱ्यांना जड जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आगामी काळात होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत जनता परिवर्तन करते की सत्ताधाऱ्यांना पुन्हा निवडून देते याकडे राजकीय जाणकार मंडळीचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.