आगामी काळातील अर्धापूर तालुक्यातील सण-उत्सव कोविड नियमांचे पालन करून शांततेत साजरे करावे – उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील व शहरातील आगामी काळामध्ये सण व उत्सवात नियमांचे पालन करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरे करावे, असे आवाहन अर्चना पाटील यांनी मंगळवार दि.५ मंगळवारी रोजी अर्धापूर येथे केले आहे. हनुमान मंदिर सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
आगामी काळात नवरात्र उत्सव, दसरा उत्सव आणि विविध धार्मिक सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. उत्सवा दरम्यान शासनाने घालून दिलेल्या नियमांतर्गत कोणत्याही प्रकारे कोणत्याही मंडळातर्फे गरबा उत्सव साजरा न करता अत्यंत साध्या पद्धतीने देवीमुर्ती स्थापना करावी असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायक, पोलीस निरीक्षक अशोक जाधव, नगरपंचायत अधिक्षक मदन कुमार डाके, जिल्हा सचिव निळकंठ मदने आदी मान्यवर उपस्थित होते.
दांडिया व विविध कार्यक्रमांवर बंदी असून कोविड नियमांचे पालन करावे तसेच सर्वांनी दुर्गा महोत्सवात कोविड नियमांचे पालन करत सर्वांनी काळजी घ्यावी शासनाच्या नियमाप्रमाणे दुर्गा महोत्सव साजरा करावा असे आवाहन उपविभाग पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी उपस्थितांना केले आहे.यावेळी नायब तहसीलदार मारोतराव जगताप, माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, अधिक्षक मदन कुमार डाके यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी संचालक प्रविण देशमुख, व्यंकटराव साखरे, गोपाल पंडीत,पोलीस पाटील अमृत राऊत, शंकरराव कदम, उल्हास कल्याणकर, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी डॉ.विशाल लंगडे, नगरसेवक गाजी काजी, फेरोज कुरेशी, हैदर जमाल, इमरान सिद्दिकी, सुनिल मोरे, माजी अध्यक्ष ओमप्रकाश पत्रे, पत्रकार सखाराम क्षीरसागर, अध्यक्ष फिरदोस हुसेनी,माजी शहराध्यक्ष शेख साबेर,शेख जुबेर, उध्दव सरोदे, माजी नगरसेवक व्यंकटी राऊत, शहराध्यक्ष संदिप राऊत, आनंद सिनगारे, साईनाथ लंगडे, मधुकर पांगरीकर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवी, पोउनि कपील अगलावे,फौजदार सय्यद अब्बास,सपोउपनी विद्यासागर वैद्य,जमादार भिमराव राठोड, संदिप आनेबोईनवाड, राजेश वरणे, धनंजय जोशी, डी.एम.राठोड, प्रकाश बोदनवाड, कल्याण पांडे, मजाजखान आदीनीं प्रयत्न केले आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक जाधव यांनी केले तर
सूत्रसंचलन निळकंठ मदने व आभार मुंजाजी दळवी यांनी मानले.
याप्रसंगी तालुक्यातील पोलीस पाटील, शहर व ग्रामीण सर्व नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष, नगर परिषद सदस्य, व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.