आगामी निवडणुका ताकदीने लढविण्याची प्रहारची रणनीती. किनवट-माहूरच्या आढावा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला निर्धार..

432

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका व ग्राम पंचायत निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्धार प्रहार जनशक्ती पक्ष किनवट, माहूर तालुक्याच्या आढावा बैठकीत करण्यात आला. दि.१९ सप्टेंबर रोजी वाई बाजार येथील व्यंकटप्रभू हॉटेल येथे किनवट-माहूर विधानसभा प्रमुख सतीश बोंतावार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत अगदी जवळ येऊन ठेपलेल्या जि.प., प,स.माहूर न.प. व दोन्ही तालुक्यातील अनेक ग्रा.प.च्या सार्वत्रिक निवडणुका प्रहार जनशक्ती पक्षातर्फे संपूर्ण ताकदीनिशी लढविण्याबाबत सविस्तर चर्चा करून निवडणूक रणनीतीची आखणी करण्यात आली. ऐनवेळी उद्भवणाऱ्या स्थितीवर मात करण्याची सुद्धा रणनीती आखून दोन्ही तालुक्यात जास्तीत जास्त जागावर प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय होण्याकरिता प्रहार जनशक्तीचे सर्वेसर्वा ना.बच्चू कडू यांचे विचार गाव, वाडी, तांड्यापर्यंत पोहचवून आगामी निवडणुकात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सत्तेच्या माध्यमातून व्यापक जनसेवेचे व्रत स्वीकारण्याचा संकल्प अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.

या बैठकीला विधानसभा कार्याध्यक्ष दत्ता बोबडे, विधानसभा संपर्कप्रमुख सुभाष दवणे, विधानसभा सचिव शिवचरण राठोड, माहूर तालुकाध्यक्ष अमजद पठाण, किनवट तालुका सचिव बंडू राठोड, किनवट शहरप्रमुख सुधीर राठोड,पप्पू सातपुते, वानोळा सर्कल प्रमुख सिद्धार्थ हरणे, विक्की मोरे, माहूर तालुका युवा उपाध्यक्ष एकनाथ मानकर, आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.