आज 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व धन्वंतरी सेवाभावी संस्था नांदेड कोअर कम्पोझिट प्रकल्प नांदेड यांच्या वतीने रेल्वे स्टेशन विभाग नांदेड येथे एड्स तपासणी व एड्स जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नललकुमार ( मुख्य रेल्वे आरोग्य अधिकारी, नांदेड डिव्हीजन,) मा.किशनलाल (हेल्थ इन्स्पेक्टर नांदेड) मा.राहुल यादव (IRCTC,) नरेंद्रसिंग,ॲड.एस.डी गायकवाड,डाॅ.अंकुश आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे लाल फित कापून उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी नवलकुमार यांनी एड्स रोग आता नियंत्रणामध्ये आपण ठेवू शकतो. लोकांमध्ये जनजागृती ही भारत सरकार व महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेने केल्यामुळे आता लोक कंडोमचा वापर जास्त करत आहेत व एआरटी गोळया एड्स पेशंट घेत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले.तरी सतत असे रक्त तपासणी शिबिर व अवेअरनेस प्रोग्राम तुम्ही घतल्यास रेल्वे विभागाच्या वतीने नक्कीच मदत करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले अधिकारी श्रीनिवास अमिलकंठवार ( नियंत्रण अधिकारी),विनोद ससाणे (सचिव), तिगाडे (समुपदेशक ICTC ) तसेच सुमीत सुर्यवंशी ( प्रोग्राम मॅनेजर),गजानन ढेरे (समुपदेशक), शिवशंकर कदम, निखिल जोंधळे (आउटरिच वर्कर), यशपाल ढगे, विकास गड्डमवार, सुधाकर चव्हाण, शिवाजी रेणके,अंकुश गायकवाड, गौरी बक्श आदी सदस्य या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धन्वंतरी सेवाभावी संस्था नांदेड यांच्या कर्मचारी यांनी फार परिश्रम घेतले आहे.