आज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन.

290

आज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन.

॥ विचार पुष्प ॥

राष्ट्रीय लोकशाही मानवी मूल्यांचे उद्गगाते

राष्ट्रीय लोकशाही मानवी मूल्यांचे उद्गगाते

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारकार्य अष्टशताब्धी वर्षानिमित्य…..

बाराव्या ते तेराव्या शतकात समाज उद्धाराची समाज क्रांती व मराठी भाषा संस्कृतीचा भक्कम पाया उभारनारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व त्यांचा पंथ
यांचे कार्य अलौकिक आहे. सामाजीक जीवनात मानवी लोकशाही राष्ट्रीय मूल्यांसाठी स्वामीचे व पंथ सांप्रदायांचे कार्य भविष्या साठी दिशादर्शकचं म्हणावं लागेलं….

I

शासना मार्फत अभ्यास मंडळा कडून जेंव्हा अभ्यासक्रमाची निर्मिती होते तेंव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहा गाभा घरक व राष्ट्रीय मुल्ये अंतरभूत असतात दहा गाभा घरकावर आधारीत शैक्षणिक धोरण ठरविले जाते. व राष्ट्रीय मुल्याची सांगड इयत्तावार पाष्ठक्रमाच्या नियोजनात केलेली असते. अशा अभ्यासक्रमातून राष्ट्रीय मुल्याचे शिक्षण विद्यार्थ्यात रुजवले जाते.यालाच मूल्यांचे शिक्षण असेही म्हटले जाते. शिक्षणा सोबत विद्यार्थ्यांना कौटूंबिक ,सामाजिक ,व राष्ट्रीय बांधिलकी जोपासता आली पाहिजे हा उद्देश अभिप्रेत असतो.

माझ्या मते सर्वज्ञांचे लिळाचरित्र, सुत्रपाठ यामध्ये शासनाच्या आधारभूत अभ्यासक्रमातीत दहा गाभा घटक व राष्ट्रीय मुल्ये हे अतिशय प्रभावीपणे ठासून भरलेले आहेत. हे स्वामीचे तत्वज्ञान शासना मार्फत अभ्यास मंडळा पर्यंत पोहचवणे हे महानुभाव सांप्रदाया समोरील व वेगवेगळ्या महानुभाव संघटने समोरील मोठे आव्हान आहे.

*तुज आहे तुज पासी …*
*परि तु जागा भूललासी.. !*

महान वैभवशाली तत्वज्ञानादा वारसा मिळालेला माझा महानुभाव पंथ व जगात महान साहित्य रचना करणारा महानुभाव सांप्रदाय. मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांची जी परंपरा निर्माण केली त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही स्वामींच्या प्रेरणेने व भक्तीच्या सामर्थ्यांने प्रचंड ग्रंथरचना महानुभाव भाष्यकारांनी केली विषेशता अनेक शास्राची निर्मिती मराठी भाषेमधूनच केली गेली त्याच बरोबर विविध ग्रंथ रचना व विविध साधन ग्रंथ मराठी भाषेतून निर्माण झाले याचे सर्व श्रेय महानुभाव लेखकांना व साहित्यिकांना जाते.

मराठी भाषेतील पहिला ग्रंथ…..
*–> लिळाचरित्र*

मराठी भाषिक पहिली कवियित्री….
*–> महदंभा*

मराठी भाषेतील पहिला ग्रंथ व पहिली कवियित्रीचा पहिला बहुमान मिळवून देणारे महानुभाव सांप्रदायी.
मराठी भाषेला देववाणीचे स्थान प्राप्त करून प्रामुख्याने लोकजीवनातील मराठी हिच आपली प्रमुख धर्मभाषा म्हणून स्वीकारली खऱ्या अर्थाने मराठीची संपन्नता वाढवण्यासाठी आधुनिक महाराष्ट्राला श्री चक्रधर स्वामीचे भाषिक ऋण मानावेचं लागते

महानुभाव पंथ आणि साहित्य यांची सुरुवातचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पासून होते श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील एक महान भाष्यकार , सर्वश्रेष्ठ समाज प्रबोधनकार व पंथप्रवर्तक होते त्यांचे जीवन कार्य निश्चितच पूढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल.

बाराव्या शतकाचा काळ पारंपारीक गैर समजूती शिगेला पोहचलेली अंधश्रध्दा व जातीय विषमता. कर्मकांडाने पूर्ण पोखरला गेलेला समाज देववादावरील निसटते पाऊल धार्मिक शैक्षणिक व भौतिक पारतंत्र्यात खितपत पडलेला समाज सामाजीक स्तरावर पूर्ण पणे समाज तत्वाचा झालेला ऱ्हास आणि त्यावर उपाय म्हणून सर्व जाती धर्माच्या उध्दारणाची जबाबदारी स्वतः स्वामीने स्वीकारली हे स्वामीच्या समोरील मोठे आव्हान होते.

त्यावेळे ईश्वर वाणीने केलेले स्वामीचे समाजप्रबोधन हेच समाज उद्धाराचे महान कार्य ठरले सर्व जीवास सन्मानपूर्वक जगण्याचा मार्ग मिळाला महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे समाज उद्धारक कार्य अलौकीक आहे.त्यांच्या तत्वज्ञानाचा व समाज प्रबोधनाचा आपण अभ्यास केल्या तर सहज असे लक्षात येते की जीवन कौशल्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसाराचे दहा गाभा घरक व राष्ट्रीय नैतिक मूल्ये हे सर्व मानव उपयोगी तत्वे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या तत्वज्ञानात अर्थात लिळाचरित्रात दिसून येतात.

जातीय समानता ,स्त्री -पुरुष समानता, भूतदया, संवेदनशीलता, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्र प्रेम, सौजन्यशीलता अशा सर्वच राष्ट्रीय मूल्याशी निगडीत स्वामीचे विचार आपण या पुढे पहानार आहोत.
क्रमशः

सर्व समाज बंधू बगिनीस …
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी …..
अवतार दिनाच्या…
हार्दिक शुभेच्छा….

क्रमशः
~~~~~~

*✍️ शब्दांकन*
पंडित तळेगावकर सर भोकर
मुख्याधापक,
जि.प.प्रा. शाळा पारवा खु.

 

Leave A Reply

Your email address will not be published.