आमदार राजेश पवार यांच्या गाडीवर हल्ला; दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या..

874

नांदेड-
नायगाव विधानसभेचे भाजप आमदार राजेश पवार हे गाडी घेऊन त्यांच्या मातोश्री नातेवाईकाच्या भेटीसाठी गेले असता त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून काचा फोडल्या बाबतचा गुन्हा नायगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांच्या मातोश्री दि.22 ऑगस्ट रोजी रविवार या दिवशी रातोळी येथे त्यांचे नातेवाईक शिवराज पाटील रातोळीकर यांचे कडे गेले होते. यावेळी रातोळी गावातील रस्त्याचे काम चालू असल्याने त्यांनी विधान परिषदेचे भाजप आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या घरासमोर आपली गाडी उभी केली होती. सदर गाडीवर सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांकडून दगडफेक केल्याने गाडीच्या मागच्या बाजूच्या संपूर्ण काच हल्लेखोरांनी अक्षरशः फोडून काढली आहे. सुदैवाने गाडीत कोणीही नव्हते. याबाबत फिर्यादी तक्रारदार सुनील पवार यांच्या सांगण्यावरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस सामान्य अमलदार यांच्या मार्फत चालू आहे.

यावर राजेश पवार यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक सुनील शिंदे यांचेकडे भ्रमनध्वनीद्वारे कळविले की, आपण लोक सेवेचा वसा हाती घेतला आहे. मतदारसंघातील गोरगरीब,मजूर शेतकरी यांच्या हितासाठी अवैधधंदे,भ्रष्टाचार या विरुद्ध माझा लढा चालू असल्यामुळे माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला असावा परंतु अशी कितीही हल्ले झाले तरी मी घाबरणाऱ्या पैकी नाही माझा लढा चालूच राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे.या हल्ल्याचा संपुर्ण मतदार संघातील भाजप कार्यकर्ते यांच्यावतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यात येत आहे. तर दुसरीकडे कडे एका भाजप आमदाराच्या गाडीच्या दुसऱ्या भाजप आमदाराच्या घरासमोरच काचा फोडल्याने नवल केल्या जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.