आसना नदीवरील नवीन पुल वाहतूकीसाठी खुला करा,अन्यथा अ.भा.छावा स्टाईलने आंदोलन छेडू- दशरथ कपाटे.
अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आसना पुल रहदारीस मोकळा करावा.
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
आसना पुल परिसरात अपघातांचे सत्र वाढत आहे. अपघातांना नियंत्रणात आणण्यासाठी आसनापूल रहदारीस मोकळा करावा, अशी मागणी छावाने केली आहे. अन्यथा छावाच्या स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी दिला आहे.
नांदेड – नागपूर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहतूक कोंडी नियमित होत आहे.बुधवारी बारड येथील तुलसीदास पुरी यांचा अपघात असना पुलाजवळ घडला आहे. अशा निष्पाप व्यक्तींचा प्राण गमवावे लागत असून संबंधित प्रशासनाने अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी आसना नदीवरील नवीन पूल वाहतूकीसाठी खुला करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते या रस्त्यावर मोठी वर्दळ असल्याने व दुरूस्ती अभावी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे आहे. आसना नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले असून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा,अशी मागणी अ.भा.छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ संभाजीराव कपाटे व स्वप्नील पाटील रातोळीकर विद्यार्थी आ.जि.यांनी अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पुल वाहतूकीसाठी लवकर सुरू करावा अन्यथा छावाच्या स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.