आसना पुलाजवळ भरधाव ट्रकने मोटारसायकल स्वारास चिरडल्याने एक जण ठार, एक जण गंभीर जखमी..
सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –
नांदेड – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने मोटरसायकल स्वारास चिरडले. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
नांदेड-नागपुर राष्ट्रीय महामार्ग जवळील आसना पुलावरून विमानतळ मार्गे जात असलेल्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या ( एम.पि.०९ एच.एफ.७९३१ ) ट्रकने चिरडले यात मोटारसायकल वरील तुळशीदास बालाजी पुरी (वय ३४)हे ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाले तर पत्नी कल्पना तुळशीदास पुरी या गंभीर जखमी झाल्या. हे दोघेही रा.बारड (हनुमान गल्ली) ता. मुदखेड येथील रहिवासी आहेत.ते पत्नीच्या उपचारासाठी दवाखान्यात जात होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
घटनास्थळी पोनि अशोक जाधव, बळीराम राठोड, महामार्ग पोनि अरूण केंद्रे,पोउनि ज्ञानेश्वर बसवंते आदींनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.महामार्गाचे पोलीस कर्मचारी रमाकांत शिंदे,अंकुश वडजे, महेश कात्रे, गजानन डवरे, ज्ञानेश्वर तिडके, सुभाष अलोने, गणेश शेळके आदींनी जखमीस पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.