आ.कल्याणकर यांच्या हस्ते सुगाव – वाघी – ढोकी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

30-54 अंतर्गत 100 लक्ष तर जिल्हा नियोजन समितीमधून 15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

427
नांदेड –
नांदेड उत्तर मतदार संघातील सुगाव – वाघी – ढोकी या तिन्ही गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी 30-54 अंतर्गत 100 लक्ष तर जिल्हा नियोजन मधून 15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून आज रविवारी नारळ फोडून या कामाचा शुभारंभ केला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, तालुकाप्रमुख जयवंत कदम, जिल्हा परिषदेचे घुटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस.बी. नरमीटवार, मयुर कांबळे, उपतालुका प्रमुख संतोष भारसावडे, सर्कल प्रमुख गणेश बोकारे, सरपंच अनिल शिंदे, उपसरपंच संतोष लोखडे, शाखा प्रमुख आम्रत भारसावडे, पांडुरंग शिंदे, बालाजीराव शिंदे, प्रवक्ते माधव महाराज, दिपक भोसले, धनंजय पावडे, पंडीतराव भारसावाडे, पंडीतराव भोसले, दादाराव भोसले, देविदासराव भोसले, चंपतराव भारसावडे, व्यकंटराव भोसले, गुलाब गुब्रे, संतोष भोसले, दत्ता भोसले, नरसिंग भोसले यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न मार्गी लागला पाहिजे, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मजबूत रस्ते तयार झाले पाहिजे, अशी भूमिका नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांची आहे. त्यांनी गेल्याच आठवड्यात राहटी येथील कॅनॉल रस्त्याचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे. या रस्त्याचे काम देखील सुरु आहे. रविवारी सुगाव – वाघी – ढोकी या तिन्ही गावांना जोडणारा अंतर्गत रस्त्यासाठी देखील जिल्हा नियोजन मधून आ. बालाजी कल्याणकर यांनी 30-54 अंतर्गत 100 लक्ष तर जिल्हा नियोजन समिती- मधून पंधरा लक्ष असा एकूण 115 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून या कामाचा त्यांच्या हस्ते शुभारंभ देखील करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी देखील आ. बालाजी कल्याणकर यांचे शुभारंभ प्रसंगी आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.