आ.बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते शहरातील डॉक्टर लेन येथे शिव भोजन थाळी शाखेचे उदघाटन.

442

नांदेड –

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.श्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या शिव भोजन थाळी, शाखा डॉक्टर लेन नांदेडचे उदघाटन नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील प्रमुख व गजबजलेले ठिकाण असलेल्या डॉक्टर लेन, शिवाजी नगर परिसरात विविध कामांसाठी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गरज ओळखून तसेच या भागात असलेले अनेक रुग्णालये, बस स्थानक व रेल्वे स्थानक याचा विचार करता या भागात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी व गरजू गोरगरिबांची पोटाची सोय व्हावी या सामाजिक हेतूने शिव भोजन थाळी शाखा उघडण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, शहर प्रमुख सचिन किसवे, महानगर प्रमुख अशोक उमरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख माधव पावडे, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पावडे, उप शहर प्रमुख रमेश कोकाटे, राजु मोरे, श्याम बन, धनंजय पावडे, दीपक भोसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, नवनाथ पाटील जोगदंड, राजेश पावडे, पावडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच रमेश लोखंडे,गोपीनाथ पावडे महाराज यांच्यासह अनेक जणांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.