आ.बालाजी कल्याणकर यांनी केली चिखली बु.रस्त्याची पाहणी.

रस्त्याचे काम प्रगतीपथावर, 100 लक्ष रुपयांचा निधी मंजुर.

461
नांदेड –
नांदेड – मालेगाव रोड ते चिखली बु.गावाच्या मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. याबाबत गावकऱ्यांनी रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे केली होती. आ. बालाजी कल्याणकर यांनी तात्काळ या रस्त्याला ग्रामविकास विभागाकडून गट 30 – 54 अंतर्गत 100 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देत, रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शनिवारी आ. बालाजी कल्याणकर यांनी स्वतः कामाची पाहणी केली असून रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय पावडे, दीपक भोसले यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

नांदेड उत्तर मतदारसंघात आ. बालाजी कल्याणकर यांची अनेक विकास कामे सुरू आहेत.चिखली बु.गावचा मुख्य रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला होता. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. त्यातच सध्या शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यांना जात असल्यामुळे, त्या वाहनांना देखील अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब चिखली बु.गावातील नागरिकांनी आ. बालाजी कल्याणकर यांच्या समोर मांडली असता, त्यांनी तात्काळ ग्रामविकास विभागाकडून गट 30 – 54 अंतर्गत 100 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. व संबंधित विभागाला सूचना देऊन रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत सुचना केल्या होत्या. सध्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शनिवारी आ.बालाजी कल्याणकर यांनी स्वतः या कामाची पाहणी केली असून रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. यामुळे चिखली बु. वासियांनी आ. बालाजी कल्याणकर यांचे आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.