इंग्लंडकडून भारताचा धुव्वा, एक डाव आणि 76 धावांनी पराभूत.

चौथ्या दिवशीच भारताचा पराभव, मालिकेत बरोबरी.

286

लीड्स-
इंग्लंडने तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात भारताचा धूळ चारत मालिकेत बरोबरी केली आहे. इंग्लंडने भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव केला. भारतीय संघाचा तिसऱ्या दिवसातील कामगिरीतील कामगिरी वगळल्यास भारताला पूर्णत: बॅकफूट ठेवत यजमान इंग्लंडने दमदार कामगिरी केली. इंग्लंडने 99.3 षटकात भारताला 278 धावांमध्ये गुंडाळले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रॉबिन्सनने तब्बल 5 जणांचा बळी घेत भारताला गारद केले. त्याने तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात पुजारा व कोहलीला बाद करत भारतावर दडपण टाकले.त्यानंतर भारताचा डाव गडगडला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताची सुरुवात निराशाजनक झाली.शतकाच्या प्रतिक्षेत असलेला पुजारा आज एकही धाव न काढता 91 धावांवर बाद झाला. त्याला रॉबिन्सनने बाद केले.नंतर विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले मात्र त्यानंतर रॉबिन्सननेच विराटला (55 ) स्लिपमध्ये बाद केले. त्या पाठोपाठ अँडरसनने अजिंक्य रहाणेला ( 10 ) माघारी तंबूत पाठवून भारताची अवस्था 5 बाद 239 अशी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.