इनरव्हील क्लब नांदेडचा मेगा प्रोजेक्ट.

368
नांदेड –

इनरव्हील क्लब नांदेडच्या वतीने आज लहुजी साळवे निराधार निराश्रीत बालक आश्रम, धनगरवाडी येथील 30 मुलांना 30 पलंग, करलोन गादया, उशा, बेडसिट, सोलापूर चादरी, ब्लँकेट्स, मुलांना नविन ड्रेस, फराळ, मिठाई, इ.वस्तू मुलांना भेट स्वरुपात वाटप करण्यात आल्या. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह गगनात न मावणारा होता. या कार्यक्रमास इनरव्हील क्लब नांदेडच्या अध्यक्ष कीर्ती सुस्तरवार, सिक्रेटरी विद्या पाटील, आयएसओ मीनाक्षी पाटील, पुष्पा गायकवाड यांची उपस्थिती होती.

नांदेडच्या खोजा कॉलनी येथील चार मान्यवरांनी वरील सर्व वस्तू मुलांना प्रेमरूपी भेट स्वरुपात दिल्याबद्दल इनरव्हील क्लबतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कीर्ती सुस्तरवार यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, इनरव्हील क्लब नांदेडतर्फे येणाऱ्या काळात आणखी नवनवीन प्रोजेक्ट घेण्याचा त्यांचा मानस असून, महिला सक्षमीकरण, निराधार मुलांना शिक्षण, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.