उप कार्यकारी अभियंता अंकुश कौरवार निलंबित; वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याचा ठपका.
नायगाव, नांदेड –
वीज वितरण कंपनी उपविभाग नायगाव येथे उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार यांच्याकडून गंभीर स्वरूपाची गैरवर्तुणूकिचे कृत्य व कामामध्ये अनियमितता घडलेली असल्याने अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी सुधाकर बाबुशिंग जाधव यांच्या आदेशानुसार उप कार्यकारी अभियंता अंकुश विजयराव कौरवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नायगाव उपविभाग अंतर्गत उपकार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत असलेले अंकुश कौरवार यांना दिनांक १५ मार्च २०२१ पर्यंत विज देयके न भरलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता एकूण ४१९४ वीजग्राहक असून ज्याची थकबाकी रक्कम रुपये २,२६ लक्ष रुपये असताना त्यांनी दिनांक २६ ऑक्टोबर पर्यंत एकूण २९२१ वीजग्राकांची रक्कम १,७८ लक्ष इतकी अद्यापही शिल्लक असल्याची दिसून आलेली आहे. लघुदाब वाणिज्य व आद्योगिक ग्राहक हे रुपये १ हजाराच्या वरील थकीत असलेल्या दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ अहवालानुसार एकूण ग्राहक ७९९ ग्राहकांची एकूण थकबाकी रक्कम ६२,७६ लक्ष इतकी शिल्लक आहे. ० ते ३० युनिटच्या वीजग्राहकांपैकी ० युनिटचे एकूण ३९५ ग्राहकांपैकी केवळ १८ ग्राहकांची तपासणी केली आहे. अजूनही ० ते ३० एकूण ३७७ ग्राहकांची तपासणी शिल्लक आहे.
दिलेल्या वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट रुपये ५.२२ लक्ष देण्यात आलेले होते व २.२० लक्ष वीज वसुलीमध्ये वाढ करण्याचे आश्वासित केले होते. परंतु वीजबिल वसुलीमध्ये कसल्याही प्रकारची वाढ न करता अद्यापही रुपये १.०७ लक्ष इतकी वीजबिल वसुली थकबाकी पूर्ण केलेली नाही. त्यांच्या हाताखाली अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कुशल नियंत्रण नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आलेली आहे. सदरचे वरील प्रमाणे कृत्य हे गंभीर स्वरूपाचे असल्याने त्यांनी धारण केलेल्या पदावर राहू दिल्यास पुढील चौकशीस बाधा येऊ शकते सबब महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सेवा विनियम २००५ मधील सेवा विनियम क्रं. ८८ ( क ) मधील तरतुदीनुसार तसेच अनुसूची ‘ग’ अनव्ये प्रदान केलेल्या अधिकारानुसार सुधाकर बाबुशिंग जाधव अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाच्या दिनांकापासून अंकुश कौरवार यांना सेवेतून निलंबन केलं आहे. यापुढे असेही आदेशित करण्यात आले की निलंबन कालावधीत त्यांना दर आठवड्याच्या सोमवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ठीक १० वाजता कार्यकारी अभियंता नांदेड ग्रामीण यांच्या कार्यालयात उपस्थित राहून हजेरी द्यावी असेही आदेशात म्हटले आहे.सदर दिवशी कार्यालयास सुटी असेल तर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हजेरी द्यावी निलंबन कालावधीत कार्यकारी अभियंता नांदेड यांच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही अशी तंबी देण्यात आली.