उमरी नगर पालिकेचे कर्मचारी चंद्रकांत श्रीकांबळे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान.

423

उमरी/नांदेड-

उमरी नगरपालिकेचे कर्मचारी चंद्रकांत श्रीकांबळे यांचा कोरोना योद्धा म्हणून कैलास देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कोरोना काळात सगळीकडे जनजीवन विस्कळीत असतांना उमरी नगरपालिकेचे कर्मचारी गणेश मदने,चंद्रकांत श्रीकांबळे,गंगाधर पवार,गौतम सोनफळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शनिवारी दि.28 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त चंद्रकांत श्रीकांबळे नगर परिषद कर्मचारी यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.